मुंबई : प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडणाऱ्या ‘बासरी उत्सव’च्या पूर्वसंध्येला ३० बासरीवादकांनी १ जानेवारी २०२५ रोजी मुंबईच्या मरीन लाइन्स, मरीन ड्राइव्ह च्या पायथ्याशी एका सराव सत्रामध्ये सहभाग झाले. प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली ८ ते ८० वयोगटातील या बासरीवादकांनी हा सराव केला. त्यांच्यात महिला आणि लाना मुलांचा समावेश होता. यंदाचा ‘बासरी उत्सव’ प्रख्यात तबलावादक दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित,करणार आहेत बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ९० बासरीवादक उस्ताद झाकीर होऊन हुसेन यांना ‘फ्लुट सिंफनी’च्या माध्यमातून देणार मानवंदना देणार आहेत.
Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये फटाका कारखाना स्फोटात ६ जणांचा मृत्यू
४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या बासरी उत्सवामध्ये प्रख्यात गायिका बेगम परविन सुलताना, ज्येष्ठ तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी, सितारवादक पंडित रवी चारी, पंडित मुकुंदराज देव आणि तबलावादक सत्यजित तळवळकर तसेच कथक कलाकार शर्वरी जमेनीस होणार या वार्षिक महोत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच पंडित हरिप्रसाद चौरसिया आपल्या बासरी वादनाने संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास आहेत आणि ,पद्मविभूषण इलाया राजा यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ प्रदान होणार आहे.