Thursday, August 14, 2025

PM Narendra Modi : सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत, तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे.





या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलं की, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. त्या महिला सक्षमीकरणाच्या दीपस्तंभ आहेत, तसेच त्या शिक्षण आणि समाजिक सुधारणेच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत. लोकांचे जीवनमान चांगले व्हावे यासाठी आम्ही काम करत असताना त्यांनी केलेले प्रयत्न आम्हाला प्रेरणा देत राहतील.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा