
ससून डॉक येथील विविध कामांची केली पाहणी
मुंबई : ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक काम करणा-या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहीत कालावधीत करावेत असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून स्थानिक अधिकारी, कर्मचारी व मत्सव्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. मत्स्यव्यवसाय विभागाची इमारत, ससून डॉकमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ कामांची दुरूस्ती करावी, परिसरात अत्यावश्यक असणारी कामे दिरंगाई होवू नये याची विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच ससून डॉक परिसरात शासनाच्या अखत्यारित कार्यरत आहेत अशा सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे याबाबतही मत्स्यव्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

पुणे : लोहगाव परिसरात संजय पार्क रस्त्यावरुन दुचाकीवर जात असलेल्या दीर-वहिनीच्या वाहनास पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिली. या ...
मंत्री राणे म्हणाले की, ससून डॉक हा सर्वात जुने बंदर असून, हा मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासळी बाजार आहे. ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवाना धारक नौका, मच्छिमारी सहकारी संस्था, शितगृह, ससूनडॉक बंदरावर आवश्यक असणा-या सोयी-सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था, मासे लिलावासाठी शेड उभारणी, नविन धक्का दुरूस्तीकरण करणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करा. महिला व पुरूषांसाठी स्वच्छतागृह सुरू करणे, मत्स्य व्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी विभागाकडून राबविण्यात येणा-या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करा.
यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यांच्यासह मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर, मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय अधिकारी पुलकेश कदम, ससून डॉकचे कार्यकारी अभियंता (प्रशासक) दीपक पवार यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.