Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर

बीड : डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाच्या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे आज ॲक्शन मोडवर आले आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात प्राप्त नियतनाच्या एकूण 92.09% धान्याचे वितरण झाले असून, उर्वरित वितरणामध्ये आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने आज धनंजय मुंडे यांनी सबंध राज्याच्या पुरवठा विभागाची व्हीसीद्वारे बैठक घेतली.

ई – पॉस मशीन वरील अडचणी, पोर्टलचे सर्वर डाऊन, यांसह विविध अडचणींची तसेच धान्य वितरणाची जिल्हा निहाय वस्तुनिष्ठ आकडेवारी धनंजय मुंडे यांनी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. ठाण्यात सर्वाधिक ९८.५९ तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी 81.69% इतके धान्य वितरण डिसेंबर महिन्यात झाले असून ही आकडेवारी शंभर टक्क्यांकडे घेऊन जाण्यासाठी ऑनलाईन व अन्य तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले असून या संदर्भात सर्व संबंधितांची पुढील आठवड्यात आणखी एक बैठक घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले आहेत.

सर्वर डाऊन असणे, किंवा अन्य कारणांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये विविध योजनेतील लाभार्थींना धान्य वितरण डिसेंबर महिन्यात होऊ शकले नाही त्यांना या महिन्यांमध्ये मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने देण्याबाबतही धनंजय मुंडे यांनी संबंधित जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील उर्वरित साखर उपलब्ध करून देणे त्याचबरोबर नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक व अन्य रिक्त पदे भरून देण्याबाबतचा प्रस्ताव देखील स्वतंत्ररीत्या मागवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना या बैठकीत निर्देश दिले आहेत. एफसीआय कडे विविध करार काही दिले व अन्य असलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यातील बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

विविध जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी धान्याचे रॅक उतरवले जातात, त्या भागातील रस्ते व अन्य सुविधांच्याबाबतही स्वतंत्र आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मुंडे म्हणाले आहेत. ई – पॉस मशीनवर डेटा उपलब्ध करून देणे, सर्वर डाऊनच्या समस्या यासह सर्वच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी स्वतंत्र निर्देश दिले आहेत.

या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव, उपसचिव, शिधावाटप संचालनालयाचे नियंत्रक, पुरवठा विभागाचे सर्व उपयुक्त तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी व उपनियंत्रक आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -