Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेRatan Tata : 'राज्यातील प्रत्येक स्किल सेंटरला रतन टाटा यांचे नाव देणार'

Ratan Tata : ‘राज्यातील प्रत्येक स्किल सेंटरला रतन टाटा यांचे नाव देणार’

ठाणे : आशिया खंडातील सर्वात मोठे उदयोग भवन उभे करतोय त्याला रतन टाटांचे नाव देणार. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक स्किल सेंटरलाही रतन टाटा यांचे नाव देणार. या सर्व स्कील सेंटरशी लघुउद्योजक संघटनानी टायअप करावे. ज्या उद्देशान ही जत्रा करता तो उद्देश ३६५ दिवस डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहा. तसेच पुढच्या कार्यक्रमापर्यंत किमान पाच लघुउद्योजक तयार करा असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून ३ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये ठाण्याच्या तीन हात नाका येथील टीप टॉप प्लाझा येथील सभागृहात बिजनेस जत्रेचे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी उद्योजकांना मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यातील उदयोजकांना रेड कार्पेट घातले आहे, ९६ हजार कोटींचे एक्सपांशन दिले.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत पुढे काय होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे!

उद्योग व्यवसाय करायचा झाला तर यशअपयश या दोन्ही गोष्टी येतात. त्यामुळे काही व्यक्ती उद्योगात पटकन भरारी घेतात. तर काहींना सुरुवातीला अपयश येऊनदेखील उद्योग मोठा करतात. त्यामुळे व्यवसाय उद्योग करताना यश अपयश पचविण्याची शक्ती अंगी बाळगली पाहिजे असे मत मोठ्या उद्योजकांनी आपल्या अनुभवातून सांगितले. या बिजनेस जत्रेचे यंदाचे चौथे वर्ष असून या बिजनेस जत्रेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभू देसाई, सॅटर्डे क्लबचे अशोक दुगाडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर नम्रता भोसले, उद्योग जत्राचे अतुल राजोळी गणेश दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लक्षवेध बिजनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे की ज्याद्वारे सर्व लघु उद्योजकांच्या व प्रोफेशनल व्यक्तींना तज्ञांना ग्राहकांना तसेच पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळे वेगळे व्यासपीठ प्राप्त होत आहे ही सगळी मंडळी एकमेकांसमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत परिणामी स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरण निर्माण होते त्याच पद्धतीचा वातावरण या बिजनेस जत्रेमध्ये आहे. लक्षवेध बिजनेस जत्रांमध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधत आहेत या बिजनेस जत्रेच्या माध्यमातून उद्योजक नवीन संधी निर्माण करणार आहेत. या बिजनेस जत्रेमध्ये लघु उद्योजकांचे व बँकांचे असे एकूण १५० च्या आसपास स्टॉल लागले आहेत तरी ठाणेकर नागरिकांनी या जत्रेत आवर्जून भेट द्यावी असे आवाहन लक्षवेधने केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -