Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

थंडीत तुमच्या पायांच्या टाचाही फुटल्यात का? या उपायाने होतील मऊमऊ

थंडीत तुमच्या पायांच्या टाचाही फुटल्यात का? या उपायाने होतील मऊमऊ

मुंबई: थंडीचा मोसम येताच आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडू लागते. यामुळे त्वचेला एक्स्ट्रा पोषणाची गरज असते. कोरडेपणामुळे त्वचा रूक्ष होऊन ती फाटू लागते. त्वचेतील ड्रायनेस आणि अनेकदा व्हिटामिन बी ३, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे टाचा फुटू लागतात.

जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल तर आज आम्ही तुम्हाला फुटलेल्या, भेगा पडलेल्या टाचा नीट करण्याचे अनेक उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या टाचा एकदम मऊ मऊ होतील.

मध आणि लिंबू

अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर असलेले मध आणि लिंबामुळे स्किन मुलायम होते. अशातच तुम्ही एक चमचा मधामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळून टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांपासून आराम मिळेल.

कोरफडीच्या गरामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. यासोबतच कोरफडीचा जेल एक चांगले मॉश्चरायजर आहे. थंडीत दररोज रात्री टाचांवर कोरफडीचे जेल लावून सॉक्स घालून झोपून जा.

व्हिनेगार आणि मीठाचे पाणी

पाणी गरम करून त्यात मीठ आणि व्हिनेगार टाका. आता यात १० मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवा. असे केल्याने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा नरम होतील.

मेणबत्ती आणि मोहरीचे तेल

फुटलेल्या टाचांवर मेणबत्ती आणि मोहरीचे तेल लावल्यानेही फायदा होतो. मेणबत्ती वितळवून त्यात दोन मोठे चमचे मोहरीचे तेल मिसळा आणि थंड करून फुटलेल्या टाचांवर लावा.

नारळाचे तेल

नारळाचे तेल फाटलेल्या कापलेल्या जागी लावण्याचा सल्ला दिला जातो. ते लावल्याने आराम मिळतो. अशातच दररोज रात्री फुटलेल्या टाचांवर नारळाचे तेल लावणे फायदेशीर मानले जाते.

Comments
Add Comment