
२० ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये ५५ लाख रुपयांची रोकड जप्त
मुंबई : भ्रष्टाचार व अन्य गैरप्रकारांना थारा न देण्याच्या आपल्या धोरणानुसार सीबीआयने आपल्याच एका पोलिस उपनिरीक्षक आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पदाचा गैरफायदा घेऊन तपासादरम्यान विविध व्यक्तींकडून अवाजवी फायदा मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सरकारी अधिकाऱ्याने वेगवेगळ्या मध्यस्थांच्या मार्फत वेब अकाउंटस व हवाला चॅनेलद्वारे लाच घेतल्याचा आरोप प्रथम माहिती अहवालात नोंदवण्यात आला आहे.

सोलापूर : मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २०२३ ची पुनरावृत्ती आहे. सोलापूर ...
एफआयआर नोंदवल्यानंतर जयपूर, कोलकता, मुंबई व नवी दिल्लीतल्या २० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यातून ५५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम हवालाच्या माध्यमातून वळविण्यात आली होती. याशिवाय सुमारे १.७८ करोड रुपयांची गुंतवणूक दर्शविणारी मालमत्तेची कागदपत्रे, १.६३ करोड रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याच्या नोंदी तसेच काही बेकायदेशीर कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.