Friday, April 11, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane Hoardings Mission : ठाण्यात अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम

Thane Hoardings Mission : ठाण्यात अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम

डिसेंबरमध्ये पालिकेने हटवले ३८९१ अनधिकृत फलक

ठाणे : डिसेंबर २०२४ मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले असून ७६ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत उच्च न्यायालयानेही गेल्या सुनावणीवेळी अनधिकृत ४९ फलकांवर काय कारवाई केली याची माहिती सादर करण्यास सांगितले होते.

Mumbai CBI : मुंबईत सीबीआयच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र फलकांचा वाढीव आकार कमी करण्याचे आदेश देण्याशिवाय महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. महापालिका अकार्यक्षम आहे, अशा शब्दांत ताशेरे मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले होते. त्यांनतर अनधिकृत पोस्टर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -