Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीसावधान....! उघड्यावर शौचास बसल्यास होणार दंड

सावधान….! उघड्यावर शौचास बसल्यास होणार दंड

अमरावती: जिल्ह्यातील गावांमध्ये उघड्यावर शौचास जात असलेल्या ग्रामस्थांवर स्थानिक दक्षता समिती मार्फत कारवाईचे आदेश दिले आहे. याची अंमलबजावणी ७ जानेवारी पासून होणार आहे. उघडयावर शौचास बसल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी पहीले दोन आठवडे पुष्प देवुन त्यांना सतंक केले जाईल. त्यानंत दंडाची कारवाई केली जाणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसून गावाच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करित आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्रया अॅक्शन मोडवर आल्या असून त्यांनी गुरूवारी तातडीने १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी यांना पत्राव्दारे कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.

ग्रामस्तरावर रहागणदारीमुक्त गावं निगराणी समिती तथा दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीचे अध्यक्ष हे ग्राम पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी,शिक्षक,पोलीस पाटील,अंगणवाडी सेविक, आशा, स्वच्छग्रही यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

यामधील स्वच्छाग्रही यांना गुडमार्निग किट सुध्दा वितरीत करण्यात आली आहे. त्यामध्येटॉर्च, व्हीसल, कॅप, टी-शर्ट, सॅक ई. साहित्य देण्यात आले आहे. ग्रामस्तरावर गठीत करण्यात आलेल्या रहागणदारीमुक्त गावं निगराणी समिती तथा दक्षता समितीर ने ७ जानेवारी पासून आठवडयातून कोणतेही तीन दिवस नियमीत पणे गुडमॉर्निग किवा गुडईव्हनिग उपक्रम राबवून उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थाना प्रथम दोन आठवडे गावस्तरावर उपलब्ध होणारे पुष्प देवून उघडयावर शौचास बसण्याच्या कृतीचा प्रतिकात्मक विरोध केल्या जाणार आहे.

त्यानतंर तिसऱ्या आढवड्यापासून, उघडयावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलमानुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदरच्या उपक्रमाचे सनियंत्रणासाठी तालुकास्तरावरुन विस्तार अधिकारी किवा समकक्ष अधिकारी यांची १० ग्रामपंचायती करिता नेमणूक करण्यात येणार आहे. ७ जानेवारी पासून पुढील २ महिण्याचे दैनिक नियोजन ५ जानेवारी पुर्वी पाठविण्यात यावे. असे निर्देश गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. प्राप्त नियोजना नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्र ह्या सुध्दा गुडमॉर्निग उपक्रमास आकस्मीक भेटी देणार असल्याने गटविकास अधिकारी ही चांगलेच धास्तावले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -