Stray Dogs : रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत!

  108

श्रीवर्धनमध्ये भटक्या श्वानांचा वर्षभरात १८३ जणांना दंश


अलिबाग : रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा (stray dogs) उपद्रव वाढला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट श्वानांच्या टोळक्यांकडून दुचाकी चालकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले असून, २०२३-२४ या कालावधीत श्रीवर्धन तालुक्यात १८३ व्यक्तींना श्वानांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत.


श्रीवर्धन तालुक्याच्या विकासात भर पडत असल्याने मागील काही वर्षांपासून श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांच्या गाड्या निर्माण झाल्या आहेत. शिवाय कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने अनेक नाक्यांवर खाद्यपदार्थाच्या गाड्यांवरील उरलेले पदार्थ टाकले जात आहेत. त्यामुळे भटक्या श्वानांना सहज अन्न उपलब्ध होत आहे. त्यामुळे चौका-चौकात रात्री-अपरात्री भटकी कुत्र्यांची टोळकी एकत्र दिसून येतात. यावेळी एखादा दुचाकीस्वार आल्यास त्यांच्या अंगावर धावत जात हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अशामुळे अनेक दुचाकीस्वार दुचाकीवरून खाली पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय अनेक पर्यटकांना देखील या भटक्या श्वानांचा उपद्रव सहन करावा लागत आहे.



त्यातच श्वानांचे निर्बिजीकरण अथवा शस्त्रक्रिया करण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून थंडावल्याने दरवर्षी श्वानांची संख्या वाढतेच आहे. नगर परिषद हद्द असो किंवा ग्रामपंचायत प्रत्येक नाका, चौकात श्वानांचे टोळके दिसून येत असते. काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन येथील जीवना बंदर परिसर, दांड व आराठी ग्रामपंचायत हद्दीत भटक्या श्वानांनी अनेकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे व शस्त्रक्रिया करणे याबाबतीत जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु कुठल्याही प्राणिमित्र संघटना अथवा अॅनिमल वेल्फेअर एजन्सीने याबाबतीत पुढाकार न घेतल्यामुळे स्थानिकांच्या पदरी निराशा आली. श्रीवर्धन नगरपरिषदेसह ग्रामपंचायतींनी यात पुढाकार घ्यायला असे पर्यटकांसह स्थानिकांचे म्हणणे आहे.


भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे ही मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुका पिंजून काढला जाईल. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पथक हजर असेल. हे पथक बाहेरील संस्थेचे असणार आहे. श्वानाला सेंटरमधे आणल्यावर त्याची शस्त्रक्रिया केली जाईल. पाच दिवस श्वानाची शुश्रूषा केली जाईल व ज्या ठिकाणावरून उचलण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांना सोडण्यात येईल. लवकर याबाबतीत टेंडर नोटीस प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेसाठी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे सहकार्य लाभले आहे. - डॉ. शाम कदम (पशुसंवर्धन अधिकारी, अलिबाग)

Comments
Add Comment

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या