Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीStray Dogs : रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत!

Stray Dogs : रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत!

श्रीवर्धनमध्ये भटक्या श्वानांचा वर्षभरात १८३ जणांना दंश

अलिबाग : रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा (stray dogs) उपद्रव वाढला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट श्वानांच्या टोळक्यांकडून दुचाकी चालकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले असून, २०२३-२४ या कालावधीत श्रीवर्धन तालुक्यात १८३ व्यक्तींना श्वानांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत.

श्रीवर्धन तालुक्याच्या विकासात भर पडत असल्याने मागील काही वर्षांपासून श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांच्या गाड्या निर्माण झाल्या आहेत. शिवाय कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने अनेक नाक्यांवर खाद्यपदार्थाच्या गाड्यांवरील उरलेले पदार्थ टाकले जात आहेत. त्यामुळे भटक्या श्वानांना सहज अन्न उपलब्ध होत आहे. त्यामुळे चौका-चौकात रात्री-अपरात्री भटकी कुत्र्यांची टोळकी एकत्र दिसून येतात. यावेळी एखादा दुचाकीस्वार आल्यास त्यांच्या अंगावर धावत जात हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अशामुळे अनेक दुचाकीस्वार दुचाकीवरून खाली पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय अनेक पर्यटकांना देखील या भटक्या श्वानांचा उपद्रव सहन करावा लागत आहे.

पडीक जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार

त्यातच श्वानांचे निर्बिजीकरण अथवा शस्त्रक्रिया करण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून थंडावल्याने दरवर्षी श्वानांची संख्या वाढतेच आहे. नगर परिषद हद्द असो किंवा ग्रामपंचायत प्रत्येक नाका, चौकात श्वानांचे टोळके दिसून येत असते. काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन येथील जीवना बंदर परिसर, दांड व आराठी ग्रामपंचायत हद्दीत भटक्या श्वानांनी अनेकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे व शस्त्रक्रिया करणे याबाबतीत जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु कुठल्याही प्राणिमित्र संघटना अथवा अॅनिमल वेल्फेअर एजन्सीने याबाबतीत पुढाकार न घेतल्यामुळे स्थानिकांच्या पदरी निराशा आली. श्रीवर्धन नगरपरिषदेसह ग्रामपंचायतींनी यात पुढाकार घ्यायला असे पर्यटकांसह स्थानिकांचे म्हणणे आहे.

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे ही मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुका पिंजून काढला जाईल. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पथक हजर असेल. हे पथक बाहेरील संस्थेचे असणार आहे. श्वानाला सेंटरमधे आणल्यावर त्याची शस्त्रक्रिया केली जाईल. पाच दिवस श्वानाची शुश्रूषा केली जाईल व ज्या ठिकाणावरून उचलण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांना सोडण्यात येईल. लवकर याबाबतीत टेंडर नोटीस प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेसाठी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे सहकार्य लाभले आहे. – डॉ. शाम कदम (पशुसंवर्धन अधिकारी, अलिबाग)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -