Wednesday, July 9, 2025

Marathi Webseries : ६ जानेवारीपासून 'दहावी अ' प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Webseries : ६ जानेवारीपासून  'दहावी अ' प्रेक्षकांच्या भेटीला

नव्या वर्षांची भेट- 'आठवी अ' च्या यशानंतर 'दहावी अ' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज


सातारा - दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि लक्षात राहाणारं वर्ष असतं. पुढच्या शैक्षणिक भविष्याची पायाभरणी ठरणारे दहावीचे वर्ष मंतरलेल्या दिवसांची साठवण असते. अभ्यासाइतकीच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय गमती-जमतीचं चित्रण असणाऱ्या ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘इट्स मज्जा’ व ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शनच्या "दहावी अ' ह्या नव्या -कोऱ्या सीरीजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच साताऱ्यातील शाहू कलामंदिरमध्ये पार पडला.
‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक नितीन पवार व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. या सोहळ्याला 'आठवी अ' या सिरिजचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


''दहावी अ'’ चे निर्माते शौरीन दत्ता यांनी सांगितले की, "गेले वर्षभर आम्ही "पाऊस", "आठवी अ" मध्ये बिझी होतो. "आठवी अ" च्या २५ व्या भागानंतर पुढे काय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. तर त्याचे उत्तर आहे "दहावी अ" या नव्या सीरिजलासुद्धा प्रेक्षकांचे प्रेम लाभणार याची खात्री आहे. नजीकच्या भविष्यात आमचे 'इट्स मज्जा' हे चॅनेल महाराष्ट्राच्या मातीशी जोडणाऱ्या आशयाने समृद्ध अशा कलाकृतींची निर्मिती करणार."



'दहावी अ’मध्ये अथर्व अधाटे, सृष्टी दणाणे, ओम पानसकर, संयोगिता चौधरी, श्रेयश कटके, सत्यजित होमकर व रुद्र इनामदार ह्या कलाकारांचा अभिनय पाहता येणार आहे. या कलाकारांची उपस्थिती ट्रेलर लाँच सोहळ्यास लाभली. ट्रेलर लाँच सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकप्रिय आर.जे. बंड्याने केले. या नवीन वर्षात येत्या ६ जानेवारी पासून सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर 'दहावी अ' प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >