Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीRailway Accident : लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहणं जीवावर बेतलं!

Railway Accident : लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहणं जीवावर बेतलं!

मुंबई : रेल्वे अपघातात (Railway Accident) सातत्याने वाढ होत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. लोकल गर्दीसह रेल्वे प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षा यांच्याशी केलेली छेडछाड अनेकांच्या जीवावर बेतत आहे. असाच प्रकार मुंबईतील वडाळा स्टेशनवर घडला आहे. चालत्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या तरुणाचा स्थानकाजवळ खांबाला धडकून जागीच मृत्यू झाला आहे.

Mobile Recharge Fraud : मोबाईल रिचार्ज करताय सावधान! एका झटक्यात होईल खातं रिकामं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन घोलप (२४) असे मृत तरुणाचे नाव असून रात्रीच्या सुमारास घोलप त्याच्या मित्रांसह कॉटन ग्रीन स्टेशनहून त्याच्या घरी परतत होता. या प्रवासादरम्यान घोलप लोकलच्या फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होता. यावेळी रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास वडाळा पूल ओलांडल्यानंतर रुळाच्या कडेला असलेल्या खांबाला घोलपचे डोके आदळले आणि या धडकेत तो रुळाच्या बाजूला पडला.

या घटनेनंतर प्रवासी आणि मृत व्यक्तीच्या मित्रांनी ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर शासकीय रेल्वे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -