
मुंबई : अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा जगभरात असतेच. त्यातही त्यांचे बोल्ड फोटो असतील तर तो चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. अशातच सोज्वळ अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दाखवले आहे. नवीन वर्षाचं औचित्य साधून अभिनेत्री सायली संजीवने 'New Year New Me' असं कॅप्शन देऊन बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठे मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहत्या घरातचं आई आणि मुलाचा मृतदेह आढळला. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीमलँड ...
'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेतून सायली संजीव 'गौरी' या पत्रामुळे ओळखली जाऊ लागली. त्यानंतर झिम्मा, झिम्मा २, गोष्ट एका पैठणीची यांसारख्या अनेक चित्रपटांतून तसेच नाटकांमध्ये देखील सायलीने कामे केली आहेत.View this post on Instagram
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सायलीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट स्विमसूट घातला आहे. स्विमिंग पूलमध्ये डोळ्याला गॉगल लावून सायलीने हटके पोज मध्ये फोटोशूट केलं आहे. सायलीच्या या फोटोंवर चाहते नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिला इंग्रजी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.