Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीPune News : पुणे स्टेशनचे होणार विस्तारीकरण; लवकरच होणार कामाला सुरुवात!

Pune News : पुणे स्टेशनचे होणार विस्तारीकरण; लवकरच होणार कामाला सुरुवात!

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरून (Pune Railway Station) दररोज २०० हून अधिक गाड्या आणि १ लाख ५० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे पुणेकरांना कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवाशांचा हा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुणे स्टेशनचे होणार विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune News : हमीभावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ!

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर दोन नवीन प्लॅटफॉर्म होणार आहेत. त्याशिवाय चार प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला आहे. पुढील काही दिवसांत याची निविदा निघेल अन् कामाला सुरूवात होईल, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या पुणे रेल्वे स्थानकावर एकूण ६ फलाट आहेत. विस्तारीकरण केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट संख्या ८ होणार आहे. त्याचबरोबर २४ डब्यांच्या गाड्यांसाठी ४ फलाट यांची लांबी वाढवण्यात येणार आहे.

खर्च किती होणार?

पुणे रेल्वे स्टेशनच्या पूर्ण विस्ताराचा खर्च तब्बल ३०० कोटी रूपये इतका असेल. यासाठीच्या निविदा प्रक्रिया आधीच सुरू झाल्या असून अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच स्थानकाचे काम सुरू होईल. (Pune Railway Station)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -