Navi Mumbai : कामोठेत बंद फ्लॅटमध्ये आढळला मायलेकांचा मृतदेह

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठे मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहत्या घरातचं आई आणि मुलाचा मृतदेह आढळला. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा आणि तिच्या ४५ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये संशयास्पदरित्या आढळून आला.

या घटनेतील मृत गीता जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी (वय ४५) हे दोघेही कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. बुधवार १ जानेवारी रोजी सायंकाळी दुर्गंध जाणवू लागला. अनेकांना इमारतीतल्या पाइप गॅसमधून वायू गळती झाल्याचा संशय आला. काही रहिवाशांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर वास कुठून येत आहे याचा शोध सुरू झाला.



जग्गी यांच्या घरातून वास येत असल्याचे लक्षात आले. वारंवार बेल वाजवून प्रतिसाद मिळत नव्हता आणि घरातून येणाऱ्या दुर्गंधीची तीव्रता दाराजवळ आणखी जाणवत होती. अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा निर्णय झाला. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच सर्वांना धक्का बसला. गीता जग्गी आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह बेडवर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळला. या दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान

महापालिका शाळांमध्ये श्रीमद् भगवत गीता पठण करण्याची भाजपची मागणी

माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी सभागृहातील ठरावाचे स्मरण करत आयुक्तांना दिले पत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी)

केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन