आज भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आपण आत्मविश्वासाने वाटचाल करत आहोत. जागतिक मंचावर स्पर्धात्मक राहण्यात आणि महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी भारताचा दृढ संकल्प गेल्या दशकभरात विविध जागतिक क्रमवारीत झालेल्या उल्लेखनीय क्रम उन्नतीमधून स्पष्ट होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने दळणवळण ते नवोन्मेष, सुरक्षा, सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली. गेल्या दहा वर्षांतली ही कामगिरी केवळ क्रमवारीतील उन्नतीविषयी नाही, तर जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका पुन्हा परिभाषित करण्याबद्दल आहे.
व्यवसाय सुलभता निर्देशांकात २०१५, २०१८ दरम्यान ४२ स्थानांची झेप घेतल्याने भारताने गुंतवणूक-अनुकूल क्षेत्र म्हणून स्थान पटकावले. भारतात कमी नियम आणि अधिक संधी असलेले व्यावसायिक वातावरण उपलब्ध आहे. त्याचबरोबर, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकातही २०१४ साली असलेल्या ७१ स्थानावरून २०१८ मध्ये ३९ स्थानांवर झेप घेतल्याने पायाभूत सुविधा, बाजारपेठेचा आकार आणि नवोन्मेष यामधील प्रगती अधोरेखित झाली. २०२२ मध्ये भारताच्या विमान वाहतूक सुरक्षा देखरेख यंत्रणेने चीन, इस्रायल, डेन्मार्कसारख्या देशांना मागे टाकत १०२व्या स्थानावरून ४८व्या स्थानावर उल्लेखनीय झेप घेतली. हे मैलाचे टप्पे/दगड, जागतिक स्थान आणि स्पर्धात्मकता मजबूत करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहेत. २०२४ मध्ये, जागतिक स्तरावर भारताची अभूतपूर्व वृद्धी उल्लेखनीय राहिली, ज्यामध्ये मुख्य क्रमवारी आणि कामगिरी त्याचा वाढता प्रभाव दर्शवते. सर्वाधिक परकीय चलन साठा असलेल्या सर्वोच्च चार देशांमध्ये स्थान मिळवण्यापासून ते जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत स्थान पटकावण्यापर्यंत, भारताची पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने परिवर्तनीय प्रगती केली आहे.
आर्थिक विकास आणि परकीय चलनसाठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा नेत्रदीपक आर्थिक विकास झाला आहे. दळणवळण कामगिरी निर्देशांक २०२३मध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी करत १६ स्थानांची सुधारणा करत १३९ राष्ट्रांपैकी ३८व्या क्रमांकावर झेप घेतल्याने भारताची व्यापार कार्यक्षमतेत वृद्धी झाली. ही झेप घेतल्याने व्यापार आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताची वाढती ताकद अधोरेखित होते. तसंच, जहाजांच्या कार्यपूर्तीचा सरासरी काळ हा जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र होत असल्यानं भारतानं अनेक विकसित राष्ट्रांनाही मागे टाकले आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदर क्षमता, बंदर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि सुधारित बंदर जोडणीमध्ये वृद्धी झाली आहे. भारतातल्या प्रमुख बंदरांमध्ये जहाजांच्या कार्यपूर्तीचा सरासरी काळ हा २०१३-१४ मध्ये असलेल्या ९३.५९ तासांवरून २०२३-२४ मध्ये ४८.०६ तासांवर आला असून तो ४८.६५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. याशिवाय, भारताच्या परकीय चलन साठ्यात ७०० बिलियन अमेरिकेन डॉलर्स एवढी वाढ नोंदवून असाधारण टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देश जागतिक पातळीवर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड नंतर चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. अन्य एका प्रभावी कामगिरीमध्ये जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक २०२४ मध्ये भारतानं ३०व्या स्थानावर घेतलेली झेप ही सरकारचं आर्थिक सुधारणांवर लक्ष असल्याची निर्देशक आहे. त्यामुळे भारत जागतिक बाजारपेठेतला एक महत्त्वाचा देश झाला आहे. २०२४ मध्ये भारत कच्च्या स्टीलच्या उत्पादनात चीननंतरचा जगातला दुसरा उत्पादक देश झाला आहे. तसंच भारतानं मोबाईल फोन उत्पादनातही दुसरे स्थान मिळवून एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून स्वतःचे स्थान मजबूत केले आहे.
उदयोन्मुख नवोन्मेष नेतृत्व
जागतिक नवोन्मेष निर्देशांक २०२४ हा या प्रगतीचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. भारताने २०१५ मध्ये असलेल्या ८१व्या स्थानावरून ३९व्या स्थानावर झेप घेतली. ही झेप देश नवोन्मेषाचे जागतिक केंद्र झाल्याचे एक महत्त्वाचे द्योतक आहे. आपला तांत्रिक दर्जा वाढवत भारत नेटवर्क रेडिनेस निर्देशांक २०२४ मध्ये ११ स्थानांची झेप घेत सर्वोच्च ५० देशांमध्ये सामील झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान सेवा निर्यातीतही भारत पहिल्या क्रमांकावर आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये प्रथमस्थानी, अाॅप्टिक फायबर कनेक्टिव्हिटी टू होम सदस्यत्व आणि मोबाईल इंटरनेट ट्रॅफिकमध्ये देश दुसऱ्या क्रमांकावर तर देशांतर्गत बाजार मोजपट्टीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. ही झेप डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करते. इतकेच नव्हे तर भारत अमूर्त मालमत्ता संपृक्ततेत जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे. हे नव्याने मिळवलेले स्थान स्वामित्व हक्क आणि ट्रेडमार्कसारख्या अभौतिक मालमत्तेत भारताच्या क्षमतेवर प्रकाश टाकते.
भारतातल्या उच्चशिक्षणाला जागतिक मान्यता
भारतातलं शिक्षण क्षेत्रही राष्ट्र जागतिक शैक्षणिक क्रमवारीत महत्त्वपूर्ण प्रगतीसह उल्लेखनीय विकासाचा अनुभव घेत आहे. ‘क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीः आशिया २०२५’ मध्ये भारताच्या ७ संस्था, ज्या आशियातल्या सर्वोच्च १०० संस्थामध्ये गणल्या जातात, यांच्यासह भारताच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला आहे. एवढेच नव्हे, तर भारतातल्या ९८४ संस्थांपैकी सूचिबद्ध १६२ विद्यापीठांसह जपान (११५) आणि चीन (१३५) यांना मागे टाकत सलग दोन वेळा क्यूएस क्रमवारीत भारत सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश बनला आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी देशाची असलेली कटिबद्धता यातून निदर्शनास येते. भारतात आणि जागतिक स्तरावर आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्था उच्च दर्जा राखत आहेत.
सायबर सुरक्षिततेला भारताचे प्राधान्य
भारतातल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांत वृद्धी होत आणि प्रथम स्तराचा दर्जा मिळवत जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक २०२४ मधले हे यश या परिवर्तनाला अधोरेखित करते. भारताने १०० पैकी ९८ पूर्णांक ४९ गुण मिळवले. ज्यामुळे भारताने सायबर सुरक्षा तत्परेसाठी जगातल्या सर्वोच्च देशांमध्ये स्थान पटकावले. हा मैलाचा दगड असून हा टप्पा व्यवसाय आणि नागरिकांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्याकडे सरकारचे असलेले लक्ष प्रतिबिंबित करतो. सशक्त सायबर सुरक्षेची संरचना तयार करण्यावर मोदी सरकारचा भर असल्याचं डिजिटल इंडियासारख्या उपक्रमांद्वारे दिसून येते. यात केवळ इंटरनेटचा विस्तारच नाही तर ऑनलाईन सुरक्षिततेत वाढ करण्यासाठीच्या उपायोजनांचाही समावेश आहे. पूर्वी केलेल्या NCIPC आणि I4C यांच्या स्थापनेसारख्या प्रयत्नांनी देशाची सायबर सुरक्षा बळकट करण्यासाठी जागतिक सायबर सुरक्षा परिप्रेक्ष्यामध्ये भारताला एक नेतृत्व म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लिंगभाव समानता
२०२२ च्या लिंगभाव असमानता निर्देशांकात, लिंगभाव समानतेतील भारताची उल्लेखनीय प्रगती दिसून येते, जिथे देशाने १४ स्थानांची झेप घेत २०२१च्या १०८व्या स्थानाच्या तुलनेत ९४ वे स्थान मिळवले आहे. ही प्रगती मोदी सरकारने राबवलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या अभियानाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी असलेली दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित करते, तसेच शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सुरक्षा यांच्यावर लक्ष केंद्रित करते. २०२३-२०२४ पर्यंत भारताची निरंतर प्रगती सुरू आहे. अधिकाधिक महिला नोकरी-व्यवसाय तसेच राजकीय नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये सहभागी होत आहेत. सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी ख्यात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची दूरदृष्टीमुळे हे बदल घडत आहेत, त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान वृद्धिंगत होईल आणि त्यांना पाठिंबा मिळेल.
पर्यटन क्षेत्राची भरभराट
भारताच्या पर्यटन क्षेत्राची भरभराट झाली आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट निर्देशांकात (TTDI) २०२४ मध्ये भारत ३९व्या क्रमांकावर आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा यांचे दर्शन घडवणाऱ्या अतुल्य भारत आणि देखो अपना देशसारख्या उपक्रमांमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळाली आहे. २०२४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत १४०० कोटी रुपयांहून (US$ १६८.५ दशलक्ष) अधिक किमतीच्या ५२ पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन केले. आशिया पॉवर इंडेक्स २०२४मध्ये भारत जपानला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हे भारताच्या वाढत्या प्रादेशिक प्रभावाचे प्रतिबिंबित आहे. अॅक्ट ईस्ट पॉलिसीसारख्या रणनीती आणि जागतिक मंचांवर देखील मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताचे अस्तित्व आणि शक्ती अधिक बळकट होत आहे.
(केंद्रीय पत्रसूचना कार्यालय)