Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीPrime Minister Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा कर्जतमध्ये बट्ट्याबोळ

Prime Minister Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा कर्जतमध्ये बट्ट्याबोळ

पोर्टलमध्ये अडचण असल्याचा आरोग्य विभागाचा खुलासा

कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षम कामकाजाचा परिणाम

७ हजार ७०० महिला या योजनेच्या लाभापासून वंचित

कर्जत : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमधून (Prime Minister Matru Vandana Yojana) शासनाकडून पहिल्या आपत्यासाठी महिलांना पाच हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. कर्जत तालुका आरोग्य खात्यात काम करणारे कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम आहे. पण मागच्या कित्येक वर्षात आशा सेविकांकडून आलेले योजनेचे फॉर्म ऑनलाइन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तालुक्यातील ७ हजार ७०० महिला या योजनेच्या लाभापासून मातृ वंचित राहिल्या आहेत.

प्रधानमंत्री गरोदर महिलेच्या सक्षम आरोग्यासाठी २०१७ साली प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. मात्र तालुक्यातील अनेक गोरगरीब व आदिवासी महिलांना, त्यांची मुले तीन ते चार वर्षांची मोठी झाली तरी अजूनही जाहीर झालेले अनुदान मिळालेले नाही. या मात वदन संदर्भात कर्जत तालुका आरोग्य खात्याकडे व जिल्हा आरोग्य खाते, जि. प. रायगड यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. पण जिल्हा शक्ति राष्ट्र शक्ति आरोग्य खात्याकडून काहीच माहिती दिली नाही. आणि तालुका आरोग्य खात्याकडून मिळालेल्या अपूर्ण माहितीवरून कंत्राटी डाटा योजना एन्ट्री ऑपरेटर यांनी या योजनेचा पूर्ण बट्ट्याबोळ केल्याचे उघड झाले आहे.

सन २०१७ ते मार्च २०२३ पर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे एकूण ५३९२ महिलांचे फॉर्म मिळाल्याचे आणि त्यातले ४८३४ फॉर्म ऑनलाईन केल्याची माहिती तालुका आरोग्य खात्याकडून माहितीच्या अधिकारात दिली होती. आशा सेविकांकडील रेजिस्टरच्या झेरॉक्स माहितीच्या अधिकारात मागितल्या नंतर आशा सेविकांनी जवळपास १० हजार ४८१ महिलांचे फॉर्म तालुका आरोग्य खात्याकडे दिल्याचे दिसते. मात्र आतापर्यंत फक्त ४८३४ फॉर्म ऑनलाईन पूर्ण केले. म्हणजे ५६४७ इतक्या महिलांचे फॉर्म अद्याप ऑनलाईन झालेले नाहीत. यातही पैसे देण्याचे शिल्लक असलेल्या महिलांची संख्या ९२९ इतकी आहे.

आरोग्य विभागाच्या कामचुकारपणामुळे तालुक्यातील किती महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत हे शोधून काढण्याऐवजी जिल्हा व तालुका आरोग्य खात्याकडून या कामचुकार व बेजबाबदार कंत्राटी कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणणे येथील वंचित राहिलेल्या महिलांचे आहे. कर्जत शहरी भागातल्या महिलांचे फॉर्म पनवेल येथे भरले जातात. ज्या महिलांचे फॉर्म भरले नाहीत आणि ज्यांना अनुदान मिळाले नाहीत त्यांना अनुदान मिळण्यासाठी ते राज्य स्तरावर पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगण्यात आले.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टलची समस्या आहे, त्यामुळे काही अर्ज मंजूर झालेले नाहीत. परंतु कर्जत तालुक्यात अद्यावत आकडेवारीनुसार ऑनलाई अर्ज न झालेल्यांची संख्या अत्यल्प राहिलेली आहे. हे काम आयसीडीसीकडे देण्यात येणार येत असून जर अर्ज दाखल करुन घेण्यात दिरंगाई होत असेल आणि त्यात काही तथ्य असलेत, तर तपासले जाईल. – डॉ. मनिषा विखे, जिल्हा आरोग्य आधिकारी- रायगड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -