मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात तापमानाचा पारा घसरलेला पहिला मिळाला त्यामुळे सर्वत्र थंडीची चादर पसरली होती. मात्र नव्याने तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू काश्मीर आणि त्याचबरोबर उत्तर पाकिस्तानमध्ये चक्रकार वारे वाहत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात राज्यातील हवामान बदलणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यभरात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं होत. राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अरबी समुद्रात वाढलेल्या आद्रतेमुळे हा पाऊस पडला आणि येत्या तीन दिवसात राज्यात तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.