Crime : मुलीशी बोलतो या रागातून १७ वर्षीय मुलाची केली दगडाने ठेचून हत्या; मुलीचे वडील व २ भाऊ अटकेत

पुणे : आपल्या मुलीशी एक १७ वर्षीय मुलगा मैत्री करुन बोलत असल्याचा राग येऊन सदर मुलास मुलीच्या पालकांनी तिच्याशी बोलू नको अशी समज दिली होती. परंतु त्यानंतर देखील तो मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीचे वडील व भावांनी संबंधित मुलास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन तसेच लोखंडी रॉड डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी करत डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. गणेश वाघू धांडे (वय-१७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.


याप्रकरणी आरोपी लक्ष्मण पेटकर (६०), सुधीर पेटकर (३२) व नितीन पेटकर (३१, तिघे रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली, पुणे) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.


याबाबत मयत मुलाचे वडील वाघु मारुती धांडे (वय- ६४, रा. वाघोली, पुणे) यांनी आरोपी विरोधात वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश धांडे हा दोन जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याच्या मित्रांसोबत घराजवळ दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी आरोपींनी मुलीशी बोलत असल्याचा राग मनात धरुन त्यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन लोखंडी रॉड व दगड त्याच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले.


पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर, घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. तसेच आरोपींना देखील अटक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.


वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड म्हणाले, मयत मुलाचे वडील हे मजुरी काम करत होते व त्यांना मुलगा देखील सहाय्य करत होता. ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच आरोपी यांचे कुटुंब राहत आहे. कुठल्यातरी अज्ञात कारणास्तव मनात राग धरुन आरोपींनी गणेश यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करत संगनमताने त्यास जीवे ठार मारले आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर,

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात