Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर, वेणुगोपाल रेड्डींकडे अतिरिक्त कार्यभार

राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर, वेणुगोपाल रेड्डींकडे अतिरिक्त कार्यभार

मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे, सातारा जिल्हाधिकारीही बदलण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये २ महिला अधिकारी आहेत. तर, सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देत भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर, पुणे झेडपीचे सीईओ संतोष पाटील यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी नियुक्ती दिली आहे.

Narayan Rane : सर्वसामान्य जनतेसाठी योजना राबवण्यात अधिकाऱ्यांनी तरबेज व्हावे : खा. नारायण राणे

मिलिंद म्हैसकर यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बी. वेणुगोपाल रेड्डी यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विकास चंद्र रस्तोगी प्रधान यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. आय.ए. कुंदन प्रधान यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विनिता वैद सिंगल यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॉ. हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॉ. निपुण विनायक यांना सचिव (१), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे. जयश्री भोज यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एच.एस.सोनवणे यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे म्हणून करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -