नवी दिल्ली: अमेरिकेच्या नयू ऑरलियन्समध्ये एक भयंकर घटना घडली आहे. येथे वेगाने जाणाऱ्या ट्रकने गर्दीला धडक दिली. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी लोक जमले होते. त्यांचा नववर्षाचा जल्लोष सुरू होता. या अपघातात कमीत कमी १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३०हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना साधारण सकाळी ३.१५ मिनिटांनी बोबरन स्ट्रीट आणि इबर्विले येथे घडले. ही ठिकाणे तेथील नाईटलाईफ आणि आपल्या व्हायब्रंट कल्चरसाठी प्रसिद्ध आहेत. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला नाही.
🚨💔 BREAKING: Horror unfolds in the heart of the French Quarter, New Orleans.
A pickup truck slammed into a crowd during New Year’s celebrations, killing at least 10 people and injuring several others. A night of joy turned into a devastating tragedy. 🌙💔
Our hearts go out to… pic.twitter.com/4WubTfofs6
— SENO ♥︎ (@Seno_Vibes) January 1, 2025
रिपोर्ट्सनुसार ड्रायव्हर ट्रकमधून उतरला आणि त्याने गर्दीच्या दिशेने गोळीबारही केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.अपघात आणि गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घटनास्थळी इमरजन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ आणि फोटोंमध्ये पोलिसांच्या गाड्या, अॅम्ब्युलन्स आणि कोरोनर कार्यालयाची वाहने दिसत आहेत. संशयितांचा तपास सुरू आहे.
हजारोंच्या संख्येने नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बोरबन स्ट्रीटवर लोक जमले होते. पोलिसांनी लोकांना अपील केले आहे की या परिसरापासून दूर रहावे कारण एमरजन्सी टीम घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, संशयितांना अटक झाली की नाही याबाबतची माहिती समोर आलेली नाही.