Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वात विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. यात एकूण १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (पोलीस उपमहानिरीक्षक) यांच्यासह एसआयटीत अनिल गुजर (पो. उप अधीक्षक), विजयसिंग शिवलाल जोनवाल (स.पो. निरीक्षक), महेश विघ्ने (पो.उ.निरीक्षक), आनंद शिंदे (पो.उ.निरीक्षक), तुळशीराम जगताप (सहा. पो. उ. निरीक्षक), मनोज वाघ (पोलीस हवालदार/१३), चंद्रकांत काळकुटे (पोलीस नाईक /१८२६), बाळासाहेब अहंकारे (पोलीस नाईक/१६७३) आणि संतोष गित्ते (पोलीस शिपाई/४७१) यांचा समावेश आहे.


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. या पथकात पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होती, त्यानुसार ही एसआयटी गठित करण्यात आल्याचं गृह विभागाने परिपत्रकात म्हटलं आहे.



कोण आहेत बसवराज तेली


सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी बसवराज तेली हे २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खंदीबुद गावचे आहेत. त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त, औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे येथे शहर उपायुक्त आणि सांगलीचे पोलीस अधीक्षकपद सांभाळलेले आहे. डॉ. तेली हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस महाराष्ट्रातील पाचोरा (जि.जळगाव) येथून झाली. सध्या ते पोलीस उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत आहेत.

Comments
Add Comment