तळोजा : मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनला अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या गेमचेंजर “मुंबई ऊर्जा मार्ग” प्रकल्पाचे काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प उभारणाऱ्या स्टरलाईट कंपनीने बधितांसाठी राबवलेल्या नियोजनबध्द कार्यपद्धतीचे शेतकरी तथा प्रकल्पग्रस्तांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
भविष्यातील विजेची गरज ओळखून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची आखणी केली. आणि या क्षेत्रातील अनुभवी आणि कुशल कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्टरलाईटने अत्यंत विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करत नवा अध्याय रचला आहे. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे या कंपनीने राबवलेल्या प्रकल्पग्रस्त केंद्रीत नियोजनबध्द कार्यपद्धतीचे शेतकऱ्यांकडून मोठे कौतुक केले जात आहे.
स्टरलाईट कंपनीकडून या प्रकल्पग्रस्तांना योग्य तो भरीव मोबदला, दिलेल्या वेळेमध्ये त्याचे वितरण, प्रकल्पाचे काम होणाऱ्या जमिनीचा सातबाराही शेतकऱ्याच्याच नावावर राहणे, बाधित जमिनीचा शेतीसाठी पुनर्वापर आणि पर्यावरण अनुकूल कार्यवाही अशा महत्त्वाच्या ठळक मुद्द्यांमुळे या प्रकल्पाचे काम वेळेमध्ये पूर्ण होण्यास मदत झाली आहे.
कंपनीने राबवलेल्या या प्रकल्पग्रस्तकेंद्रीत नियोजनबध्द कार्यपद्धतीने इथल्या शेतकरी आणि प्रकल्प बाधितांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण आहे. इतकेच नाही तर एक सामाजिक बांधिलकी जपत स्टरलाईट कंपनीने या भागांत केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
त्यामुळेच तर शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तांकडून कोणत्याही विरोधाशिवाय राज्याच्या दृष्टीने इतका मोठा गेमचेंजर प्रकल्प आज विक्रमी वेळेमध्ये पूर्ण झाला आहे. ज्याच्या पाऊलावर पाऊल टाकून इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली जात आहे.