शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या झोळीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मूळचे जम्मू आणी काश्मीर आणी सध्या शिर्डी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती टिकू या साईभक्त महिलेच्या परिवाराकडून १३ लाखांचा सुवर्णहार अर्पण केला आहे.
Pandharpur Temple : नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांची आकर्षक सजावट!
दरम्यान, श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.दि. १ जानेवारी २०२५ रोजी नववर्षाच्या निमित्ताने मुळचे जम्मु काश्मिर येथील परंतू सध्या शिर्डी येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती बबीता टिकू व परीवार यांनी श्री साईचरणी २०६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण केला याची किंमत १३ लाख ३० हजार ३४८ रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.