कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गुरुवार २ जानेवारी रोजी तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ही माहिती महापालिकेच्या पाणी विभागाने दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची दुरूस्ती करणे व प्रभाग क्षेत्रातील वितरण वाहिनीवरील पाणी गळती थांबविण्याकरीता गुरुवार २ जानेवारी रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रामधून महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण (पूर्व व पश्चिम), कल्याण ग्रामिण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे), व डोंबिवली (पूर्व व पश्चिम) परिसरास होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाणीसाठा करावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.