Saturday, June 21, 2025

नवीन वर्षात MSEBची ग्राहकांना विशेष भेट

नवीन वर्षात MSEBची ग्राहकांना विशेष भेट

सोलापूर : नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा‘ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे.


त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. मात्र, आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी एकरकमी सवलत मिळणार आहे.गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ‘ई- मेल’द्वारे वीज बिल पाठविण्यात येते.शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत चार लाख ६२ हजार म्हणजेच १.२५ टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे.

Comments
Add Comment