Wednesday, July 2, 2025

Happy New Year 2025: वेलकम २०२५, भारतासह जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत

Happy New Year 2025: वेलकम २०२५, भारतासह जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत

मुंबई: जुने वर्ष२०२४ला गुडबाय करताना २०२५ या वर्षाचे जोरदार स्वागत झाले आहे. नवीन वर्षाचा उत्साह, जुन्या गोष्टी मागे सारून आणि उज्ज्वल भविष्यासह पुढे जाण्याची ही वेळ आहे. जगातील विविध भागांमध्ये वेगवेगळा टाईमझोन असल्याने प्रत्येक देशाचे नवे वर्ष हे विविध वेळी सुरू होते. भारताच्या आधी ४१ देश असे आहेत जे नववर्ष आधी साजरे करतात.


देशभरातही नववर्षाचा उत्साह आहे. २०२४ हे वर्ष मागे सारून आता २०२५ या वर्षात आपण प्रवेश करत आहोत. देशात नवीन वर्षाचा मोठा उत्साह आहे. नव्या वर्षाची सुरूवात भक्तीमय व्हावी यासाठी देशातील विविध मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. अनेकजण वर्षाचा पहिला दिवस हा देवाच्या दर्शनाने सुरू करतात. त्यामुळेच मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.



काश्मीर, हिमाचल प्रदेश, झारखंडपासून ते आसाम आणि दक्षिण भारताच्या कन्याकुमारीपर्यंत अत्यंत हर्षोल्लोसात हे नवीन वर्ष साजरे केले जात आहे. पंजाबमधील सुवर्णमंदिरातही लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी पार्ट्या करून, केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.


अनेक ठिकाणी नववर्षाच्या पार्टीसाठी डिजे, म्युझिकची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तरूणाईचा या नववर्षाच्या पार्टीमध्ये सहभाग असतो.



पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सर्वांना नव्या संधी, यश आणि भरपूर आनंदाचे जावो. तसेच सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो असे त्यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment