वाडा : वाडा शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात येण्यासाठी वाडा नगरपंचायतीने रात्रीच्या सुमारास दुभाजक उभारले होते मात्र एका वाहनचालकामुळे ते संध्याकाळीच आडवे झालेले दिसत आहेत. खंडेश्वरी नाका ते परळी नाका दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत भाजी,फळे व इतर वस्तू विकणारे व अवास्थव दुचली व चारचाकी वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली आहे. दुभाजक लावल्याने वाहन चालक नियमांचे पालन कारून आपली वाहने चालवतील, कुठेही वाहन उभी करणार नाहीत यासाठी रातोरात नगरपंचायतीने दुभाजक उभारले त्या बद्दल वाडा वाशियांनी समाज माध्यमांवर मुख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहवा केली पण बेसिस्त वाहनचालकाने धडक दिल्याने एक दुभाचक आडवा झाला आहे, अवघ्या एकाच दिवसात दुभाजकाची अशी अवस्था होत असेल तर महिन्या भरात तरी हे दुभाजक राहतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा वाहन चालकांवर कारवाई करून तुटलेला दुभाजक काढून त्वरित दुसरा दुभाजक लावण्याची मागणी होत आहे.
सकाळी लावलेले दुभाजक; संध्याकाळी तुटले
