९४ किलोमीटर प्रवासाला पहाटे सुरुवात करणार..
नेरळ : कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचा बलिदान दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करणेसाठी सायकल वरून फिरणार आहे. क्रांतिवीर यांच्या जीवनावरील आझाद दस्ता धडा शैक्षणिक अभ्यास क्रमात घ्यावा आणि हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांच्या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे या मागणी साठी नेरळ गावातील १२ वर्षीय हिरेन राम हिसालके हा सायकल पटू तब्बल ९४ किलोमीटर सायकल प्रवास वरून प्रवास करणार आहे. मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया येथून हिरेन पहाटे ५.३० वाजता प्रवास सुरू करणार असून सकाळी १०.३० वाजता नेरळ येथील हुतात्मा चौकात पोहचणार आहे.
नेरळ गावातील वाल्मिकीनगर भागात राहणारा हिरेन हा नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेत शिक्षण घेत आहे. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने सायकल वरून फिरून अभिवादन केले आहे. आता हा १२ वर्षीय सायकल पटू हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनी मुंबई ते नेरळ असा सायकल प्रवास करणार आहे. क्रांतिकारक भाई कोतवाल आझाद दस्त्यातील वीरांचे बलिदानाचे महत्व समजावे यासाठी आझाद दस्ता’ हा धडा शाळेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा. क्रांतिकारक वीर भाई कोतवाल यांचे माथेरान येथील मोडकळीस आलेले घर राष्ट्रीय स्मारक म्हणून उभे करणार ही केलेली घोषणा शासनाने पुर्ण करावी.
या प्रमुख दोन मागण्या घेवून ११ वर्षीय सायकलपटू हिरेन हिसालके हा गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते हुतात्मा चौक नेरळ असा साधारण १०० किलोमीटर अंतर सायकलवर आपल्या देशाचा तिरंगा ध्वज फडकवत प्रवास करणार आहे.
सायकलिंग ची सुरुवात
* २ जानेवारी २०२५ पहाटे ५:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करुन गेटवे ऑफ इंडिया येथून होईल
* त्या नंतर फ्लोरा *फाउंटन येथे हुतात्मा चौकात* हुतात्म्यांना अभिवादन करून.
* मुंबई फोर्ट शिवडी वडाळा चेंबूर मानखुर्द वाशी खारघर कळंबोली पनवेल चौक कर्जत नेरळ* असा प्रवास असेल..
* शेवटचा थांबा नेरळ हुतात्मा स्मारक हुतात्मा चौक नेरळ