मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सूर्य मावळल्यानंतर काही गोष्टींचे दान करणे योग्य मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती अशी चूक करत असेल तर त्या व्यक्तीला याचे नुकसान भोगावे लागते. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींचे दान रात्रीच्या वेळेस केल्याने नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार सूर्य मावळल्यानंतर कधीही कोणाला दुधाचे दान देऊ नये. असे केल्याने आर्थिक स्थिती बिघडू शकते. दुधाचा संबंध चंद्राशी तसेच सूर्याशी असतो. रात्रीच्या वेळेस दुधाचे करणे अशुभ असते. यामुळे घराच्या भरभराटीवर परिणाम होऊ शकतो.
Astrology : नवे वर्ष २०२५मध्ये या ३ राशींचा सुरू होणार ‘गोल्डन टाईम’
वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने दुधापासून बनवलेले दहीही सूर्य मावळल्यानंतर दान करू नये. दहीला शुक्राचे प्रतीक मानले जाते. शुक्र सुख आणि ऐश्वर्याचे देवता आहेत. रात्रीच्या वेळेस याच कारणामुळे दही कोणालाही देऊ नये. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर दही दान केल्यास संकटे चारही बाजूंनी घेरतात आणि व्यक्ती आनंदी राहत नाही.
रात्रीच्या वेळेस मीठाचे दानही अशुभ मानले जाते. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा प्रबळ होते. तसेच प्रगतीमध्ये बाधा येते.
टीप – वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वास्तुशास्त्राची कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.