मुंबई : अभिनेत्री सुकन्या मोनेंनी मराठी मालिका, चित्रपट तसेच मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे.आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयासह सुकन्या मोने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी आपल्या लेकीने ऑस्ट्रेलियात मास्टर्स डिग्री मिळवल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Chiki Chiki Bubum Bum : नव्या वर्षात ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाची धमाल ट्रीट
सुकन्या मोने मुलाखतीत नेहमी त्यांच्या लेकीचं कौतुक करत असतात. त्यांची मुलगी ज्युलिया सध्या परदेशात शिक्षणासाठी गेली आहे. नुकतंच तिने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्युलियानेऑस्ट्रेलियात मास्टर्स डिग्री मिळवली आहे.आपली लेक चांगल्या मार्कांनी पास झाल्याबद्दल अभिनेत्रीने आनंद व्यक्त करत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये लाडक्या लेकीसोबतचे खास फोटो, व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलंय, “जुलिया संजय सुकन्या मोने….Master degree in animal science from University of Queensland Brisbane Australia…. पदवी ग्रहण समारंभाला गेले होते…. त्याची काही स्मरणचित्र… हळूहळू सगळी पाठवत जाईन…. आमच्या आनंदात तुम्हालाही सामील करायला आवडेल.”सुकन्या मोनेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सुकन्या मोने यांची लेक जुलियाने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. आई-वडिलांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात तिने करियर करायचं ठरवलं आहे.’मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’ या विषयात तिने पदव्युत्तर पदवी ग्रहण केली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सुकन्या मोनेंची लेक परदेशात शिक्षण घेत होती. अखेर तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आहे.