Thursday, March 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजKarnataka Temple : अरे देवा! नवसात केली सासूच्या मृत्यूची मागणी

Karnataka Temple : अरे देवा! नवसात केली सासूच्या मृत्यूची मागणी

बंगळूर : आतापर्यंत देवाकडे भाविक मूल-बाळ होण्यासाठी, आजारपणातून बरं होण्यासाठी काहीजण परीक्षेत पास होणं, स्वप्न पूर्ण होणं अशा वैयक्तिक कारणाचे नवस करतात. मात्र कर्नाटकमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अजब-गजब नवस केल्याचे समोर आले आहे. (Karnataka Temple)

Walmik Karad : बीड हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण!

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका देवीकडे ‘सासू मरु देत’ असा नवस केला आहे. अज्ञाताने २० रुपयाच्या नोटवर ‘माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे’ असे लिहले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुकाच्या कातादरगी भागात भाग्यवंती मंदिर आहे. त्या मंदिरातील व्यवस्थापनाने दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू केली होती. दानपेटीत २० रूपये सापडले. २० रूपयामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं ‘माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे’ असं लिहिलेलं आढळलं.

दरम्यान, ही नोट नेमकी कोणी टाकली हे समोर आलेलं नाही. परंतु कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा होत आहे. (Karnataka Temple)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -