Monday, May 12, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Aus vs Ind : ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धूची संतप्त प्रतिक्रिया

Aus vs Ind : ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धूची संतप्त प्रतिक्रिया

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत टीम इंडिया ला जिंकवण्यासाठी ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ट्रेव्हिस हेडने पंतला बाद केले. पंत बाद होऊन पॅव्हेलियनला जात असताना हेडने जल्लोष करताना अपमानास्पद इशारा केला. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. आता भारताचा माजी सलामीवीर नवजोत सिंग सिधूने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


भारतीय डावाच्या ५९व्या षटकांत पंतला बाद केले. यानंतर ट्रेव्हिस हेडने विचित्र हातवारे करत विकेटचे सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिद्धूला हे सेलिब्रेशन अजिबात आवडले नाही. सिद्धू यांनी एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रेव्हिस हेडने गलिच्छ पद्धतीने केलेला जल्लोष हा क्रिकेटच्या जंटलमॅन गेमसाठी नाही. हे सर्वात चुकीचे उदाहरण आहे.जेव्हा मुलं, महिला, युवक आणि ज्येष्ठ खेळ पाहत असतात. अशा प्रकराची कृती एका व्यक्तीसाठी (ऋषभ पंत) १.५ अब्ज भारतीयांचा आणि एका राष्ट्राचा अपमान आहे. त्याला कोठोर शिक्षा दिली पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी उदाहरण ठरेल. आणि अशा प्रकारची कृती करण्याची कोणी हिम्मत करणार नाही.





या प्रकरणावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधारपॅट कमिन्स म्हणाला की, त्याने बरेच झेल घेतले. त्यामुळे त्याला असे दाखवायचे असावे की त्याच्या हाताची बोटं आता गरम झाली असून त्याला बर्फाने भरलेल्या एखाद्या ग्लासमध्ये हाताची बोटं घालून ठेवावी लागतील. तो प्रकार खूपच कॉमेडी आहे. त्यात वाईट किंवा विचित्र असे काहीच नाही. त्याने जुन्या प्रकारचे सेलिब्रेशन पुन्हा एकदा केले. मात्र, ही गोष्ट कधीच मान्य होणार नाही.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत वादात सापडण्याची ट्रेव्हिस हेडची ही दुसरी वेळ आहे. याआधी तो मोहम्मद सिराजला भिडला होता. १४० धावांवर सिराजने त्याला बाद केले होते. तेव्हा तो सिराजकडे पाहून काही तरी म्हणाला होता. त्यावर सिराजने देखील प्रतिक्रिया दिली होती.

Comments
Add Comment