Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्र माझ्या पाठीशी उभा राहिला, धस यांच्या माफीनाम्यानंतर प्राजक्ता झाली व्यक्त

महाराष्ट्र माझ्या पाठीशी उभा राहिला, धस यांच्या माफीनाम्यानंतर प्राजक्ता झाली व्यक्त

मुंबई (प्रतिनिधी) : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवर व्हायरल होत आहे. सुरेश धस यांचा विषय संपल्याचे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. शिवाय प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आभार देखील मानले आहेत.

आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ताची आणि समस्त महिला वर्गाविषयी चुकीचे वक्तव्य केले गेले असेल तर दिलगिरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ घेतला. यामुळे त्यांना हा त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर प्राजक्ताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिची प्रतिक्रिया शेअर केली.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता म्हणाली की, सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार, सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आतापर्यंत मी आणि माझ्या कुटूंबियांनी शेकडो फोन कॉल्स, मेसेजेस, सोशल मीडिया टॅग रिसिव्ह केले. महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरातून आवाज उठवला गेला. पाठींबा दिला गेला, समर्थन दिले गेले. यामुळे आम्हाला फार बळ मिळाले, समाधान वाटलेय खूप खूप धन्यवाद. याबरोबरच माननीय आमदार सुरेश धस यांचे खूप खूप आभार. मोठ्या मनाने त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप खूप आभार. असे करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात, हे दाखवून दिले. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो. ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचेच विचार इथे चालतील, हे तुम्ही दाखवून दिले. धन्यवाद म्हणत हा विषय संपला असल्याचे प्राजक्ता माळी यांनी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -