मुंबई: अनेक लोक असे आहेत ज्यांना फिट राहायचे आहे आणि ते फिट राहण्यासाठी हेल्दी डाएटही घेतात. अनेक लोकांना आपले आयुष्य निरोगी आणि दीर्घकालीन असावे असे वाटत असते. यासाठी ते विविध उपाययोजना करत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षिचे पती डॉ. श्रीराम नेने हेही सोशल मीडियावर आरोग्य आणि डाएटसंबंधी माहिती देत असतात.
डॉ. श्रीराम नेने कॉर्डिओवस्क्युलर आणि थोरेसिक सर्जन आहेत. त्यांनी वॉशिंग्टन युनिर्व्हसिटीतून ग्रॅज्युएशन आणि मेडिकलचे शिक्षण घेतले आहे. नुकतेच त्यांनी दीर्घायुषी जीवनासाठी काही सिक्रेट्स शेअर केलेत. हे फॉलो करून तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.
बॅलन्स डाएट घ्या
डॉ. नेने सांगतात हेल्दी पदार्थ खाल्ल्याने वय वाढीपासून रोखण्यास मदत होते. त्यामुळे नेहमी बॅलन्स डाएट घ्या.
एक्सरसाईज करा
दररोज एक्सरसाईज केल्यानेही वय रोखण्यास मदत होते. याचे कारण म्हणजे एक्सरसाईज केल्याने अथवा अॅक्टिव्ह राहिल्याने तुमची स्किन लवकर म्हातारी होत नाही.
Winter diet: शरीराला आतून उष्ण ठेवतील किचनमध्ये ठेवलेले हे ५ मसाले
स्मोकिंग सोडा
स्किनला अधिक तरूण राखण्यासाठी तसेच रिंकल्सपासून बचावासाठी स्मोकिंग करणे सोडा
दारू पिणे टाळा
लिव्हरचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक्षमता मजबूत बनवण्यासाठी दारू पिणे टाळले पाहिजे. हा चांगला पर्याय आहे.
त्वचेची काळजी घ्या
त्वचेला ग्लो करण्यासाठी आणि डॅमेजपासून बचावासाठी सनस्क्रीनचा वापर करा.