रत्नागिरी : पुण्यात बालेवाडी येथे सक्सेस अबॅकस अ़ॅन्ड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत गार्गी घनश्याम घडशी हिने एक लाखाची शिष्यवृत्ती मिळवली आहे. अडीच हजार विद्यार्थ्यांमधून तिने स्वतःला सिद्ध केले आहे.
View this post on Instagram
हुशारी, चातुर्य, तर्कशुद्धता, अंदाज, पाठांतर, उत्तम स्मरण, खेळात, अभ्यासात आवड अशा गुणांचा योग्य वेळी विकास झाला तर अशी मुले प्राथमिक शिक्षणापासूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शन व स्वतःची जिद्द ठेवून पुढे वाटचाल करतात. त्यामध्ये गार्गी घनश्याम घडशी हिचा समावेश आहे. ती सावर्डे (ता. चिपळूण) येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहावीत शिकत आहे. गार्गी अशा स्पर्धेत नेहमीच भाग घेऊन अभ्यासाचे सातत्य राखत असते.
Aus vs Ind : ट्रेव्हिस हेडच्या ‘विचित्र’ सेलिब्रेशनवर सिद्धूची संतप्त प्रतिक्रिया
तिला मिळालेल्या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यासाठी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर , अभिनेते स्वप्नील जोशी, सक्सेस अबॅकसचे मुख्य सीईओ किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गार्गी पेन्शन फायटर सौ. गौरी व घनश्याम घडशी यांची कन्या असून मुलीही कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.