Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीRatnagiri : रत्नागिरीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी २० कोटीचा निधी मंजूर

Ratnagiri : रत्नागिरीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी २० कोटीचा निधी मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यासाठी २० कोटींहून अधिकचा निधी एमआयडीसीने दिला असून, पाटबंधारे विभागाकडून यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

या दुरुस्तीमुळे ०.३४१ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. पानवल धरणाच्या ६० वर्षांनंतर दुरुस्तीला सुरुवात झाली. सध्या या धरणाला ५० टक्क्यांच्या वर गळती आहे. धरण धोकादायक बनल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक होती. या धरणाच्या मजबुतीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू झाले आहे. पानवल धरण १९६५ ला बांधले आहे. शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापैकी हे एक आहे. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील साठा दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे. परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे.

Pune Grand Army Day : पुण्यात साजरा होणार भव्य आर्मी डे!

शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर पानवल धरण आहे. हे धरण १९५२ मध्ये मंजूर झाले. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता केवळ नैसर्गिक उताराच्या आधाराने शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे एकमेव धरण आहे. पानवल धरणातील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते. शुद्धीकरण करून ते नागरिकांना पुरवले जाते. पानवल धरणातून शहराची पूर्ण गरज भागत नाही; परंतु काही महिने विनाखर्च शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण खूप उपयोगी मानले जाते. पानवल धरणात ५१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर नागरिकांकरिता सहा महिने केला जातो. त्या कालावधीत शीळ धरणातून पाण्याची उचल कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे पालिकेच्या वीज बिलात मोठी कपात होते. या धरणाच्या दुरुस्तीचे काम निर्माण ग्रुपने घेतले असून, वर्षाची त्याला मुदत दिली आहे; परंतु मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -