
मुंबई : गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध ५० विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात श्री. भुसे यांनी सोमवारी शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला. शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असणार आहेत. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग काम करणार आहे. राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाख ८ हजार शाळा असून ७ लाख २९ हजार शिक्षक आहेत. विविध उपक्रम योजनांसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. पुढील काही दिवसात शिक्षक, विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोगत आणि अनुभव जाणून घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात येतील. यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल.

मुंबई : प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या (Prajakta Mali controversy) आमदार सुरेश धस यांनी अखेर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली ...