
मोठ्या टीकेनंतर थेट पार्टी रद्द करण्याचा निर्णय
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये (New Year Party) येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहेत. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमधील हा प्रकार आहे.
३१ डिसेंबरच्या आधी ग्राहक अधिकाधिक आपल्याकडे खेचण्यासाठी पब व्यवस्थापक अशा प्रकारच्या युक्ती लढवत असतात. त्याचपद्धतीने पुण्यातील स्पिरिट कॅफे या पबकडून कंडोम, ओआरएस आणि सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले.

मावळ : नववर्ष सुरु (New Year 2025) होण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटन स्थळांना भेट ...
संबंधित प्रकार समोर येताच आणि पोलिसांची चौकशी सुरु होताच कंडोम वाटणं गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करतोय. जनजागृती व्हावी यासाठी आम्ही कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे, असा दावा संबंधित पबकडून करण्यात आला होता.

मुंबई : २०२४ला अलविदा करण्यासाठी आणि २०२५ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरात ठिकठिकाणी विविध ...
ही गोष्ट समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात आली, त्यानंतर आता ही पार्टी रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबकडून करण्यात आलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंदवले गेले आहेत. कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा पब व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.