कल्याण:कल्याणजवळील आंबिवली येथे अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे संतापजनक कृत्य घडले आहे. अघोरी विद्येच्या मदतीने समस्या सोडवतो असे सांगत या भोंदूबाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केले.
या प्रकरणी मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या भोंदू बाबाविरोधात विनयभंगाचा खटला दाखल केला आहे. अरविंद जाधव असं या भोंदूबाबाचे नाव आहे. पीडित तरूणीने खडकपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पीडित तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, ही तरूणी आपल्या नातेवाईकासह या भोंदूबाबाकडे गेली. यावेळीस या भोंदूबाबाने नातेवाईकाला बाहेर थांबायला सांगितले. त्यानंतर भोंदूबाबाने त्या मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. भोंदूबाबाचे हे कृत्य पाहून ती तरूणी घाबरली आणि तिने तेथून पळ काढला.
यानंतर या तरूणीने पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. दरम्यान, तरूणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सुरू आहे. भोंदूबाबाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी या तरूणीने केली आहे.