Saturday, March 15, 2025
Homeमहत्वाची बातमीसंतोष देशमुख हत्येतील सर्व दोषी फासावर लटकेपर्यंत कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

संतोष देशमुख हत्येतील सर्व दोषी फासावर लटकेपर्यंत कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

देशमुखांच्या भावाशी फोनवरून केली चर्चा

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(santosh deshmukh) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडच्या प्रकरणात कोणालाही आम्ही सोडणार नाही, ज्यांचे संबंध या प्रकरणात आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचं राज्य मी चालू देणार नाही, कोणालाही पैसा, खंडणी मागता येणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याला शरणागती पत्करावी लागली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं कामी लागलेली आहेत आणि कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. संतोष देशमुख यांच्या भावाशी माझी फोनवरुन चर्चा झाली आहे, त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे, काळजी करुन नका. काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तो पर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील हे आश्वासन मी दिलं आहे. तर संयशित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर कोणती कारवाई होईल ते पोलिस तपास करुन ठरवतील आणि जे जे पुरावे आहे त्याच्या आधारावर कोणालाही सोडलं जाणार नाही. आम्ही जाणीवपूर्वक केस सीआयडीला दिली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या टिकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. कोणीही काही म्हणत असलं तरी पोलीस पुराव्याच्या आधारानुसार कारवाई करतील. त्यामुळे विरोधक काय बोलतायत हा विषयच नाही. कोणाकडे पुरावे असतील त्यांनी द्या, माझ्या करिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांचा शिक्षा होणं महत्त्वाचं आहे, काही लोकांना राजकारण महत्वाचं आहे. त्यांच राजकारण त्यांना लखलाभ त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही, काय फायदा होईल मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -