Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीIlu Ilu Movie : वीणा आणि वनिता रंगवणार सख्ख्या शेजाऱ्यांची पक्की गोष्ट

Ilu Ilu Movie : वीणा आणि वनिता रंगवणार सख्ख्या शेजाऱ्यांची पक्की गोष्ट

मुंबई : ‘नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो. सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. गुणी अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत. आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात त्या शेजारधर्म निभावताना दिसतील. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.

पूर्वीच्या चाळ संस्कृतीमध्ये शेजारी हे अगदी आप्त स्वकियांसारखे असायचे. सगळ्या सुख दुःखा मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यातून अनेक गमतीदार किस्से घडायचे, या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

Nagpur – Madgaon Express : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर

या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. संगीता सुर्वे आणि जाधव बाई या व्यक्तिरेखेत त्या दिसणार आहेत. ‘आम्ही दोघींनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून एकत्र काम करताना खूप मजा आल्याचं या दोघी सांगतात. धमाल अनुभव असणारा ‘इलू इलू’ चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास दोघी व्यक्त करतात’.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -