Saturday, May 24, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Reliance Foundation Scholarship : पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

Reliance Foundation Scholarship : पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

रिलायन्स फाऊंडेशनकडून गरजू विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांची शिष्यवृत्ती



मुंबई :
अंबानी कुटुंबाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या रिलायन्स समुहाकडून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी बरंच सामाजिक काम करत असतात.नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा आहेत.नीता अंबानींच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमधून हजारो मुलांना आतापर्यंत मदत करण्यात आली आहे. याच सेवाभावी उपक्रमांमध्ये रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. हुशार विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या आधारावर गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून केली जाते. मात्र या शिष्यवृत्तीसाठी कुठे आणि कसा अर्ज करावा हे अनेकांना ठाऊक नसतं. याविषयीची माहिती आता समोर आली असून २०२४-२५ च्या वर्षासाठी पद्युत्तर शिक्षण घेणारे कोणते विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.


रिलायन्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीमधून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा मुख्य हेतू आहे. उच्च शिक्षणासाठी या माध्यमातून मदत केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमोटर धिरुभाई अंबानी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाऊंडेशनकडून 5 हजार पदवीधर विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. २०२४-२५ च्या वर्षासाठी पद्युत्तर शिक्षण घेणारे कोणते विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.रिलायन्स फाऊण्डेशनच्या या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख रुपये दिले जातात.



देशभरातील एका लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी अट फार साधी आहे. ज्यांच्या घरातील एकूण वर्षिक कमाई १५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. कोणत्याही शाखेचं शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. तसेच विद्यार्थीनी आणि दिव्यांगांना यामध्ये विशेष कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.कंपनीच्या वेबसाईटनुसार रिलायन्स फाऊंडेशनच्या पद्युत्तर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देशातील सर्वच भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी आहे. तसेच या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेच्या फायदा घेतलेल्यांकडून मार्गदर्शनही केलं जातं.

Comments
Add Comment