
वाडा : राज्यातील दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या (Milk Price) चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर पाच रुपये तर नंतरच्या कालावधीत सात रुपयांचे अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

'असे' असतील पर्यायी मार्ग पुणे : नववर्षाच्या सुरुवातीला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येत्या वर्षाचे स्वागत ...
खाजगी दूध प्रकल्पांना ३.५ फॅक्ट/८ पॉईंट पाच एस एन एफ गुणमानाच्या दुधासाठी १ आक्टोंबर २०२४ पासून प्रति लिटर २८ रुपये दर निश्चित केला आहे. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत.
दरम्यान, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, व राजस्थानमध्ये म्हशीच्या दुधाला ही अनुदान दिले जात आहे.