नवी दिल्ली: अमेरिकेचे ३९वे राष्ट्रपती जिमी कार्टर यांचे रविवारी वयाच्या १००व्या वर्षी निधन झाले. ते १९७७ ते १९८१ या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती होते. मिळालेल्या माहितीनुसार ते दीर्घकाळापासून आजारी होते. १ ऑक्टोबर १९२४ला जन्मलेले कार्टर यांना २००२मध्ये नोबेलचा शांतता पुरस्कार देण्यात आला होता. १९७७मध्ये आर फोर्ड यांना हरवत ते राष्ट्रपती बनले होते. या दरम्यान अमेरिकेने मिडल ईस्टसोबत नात्याची पायाभरणी केली होती.
पदावर असताना आणि नसतानाही कार्टर यांनी शांततेसाठी तसेच मानवी कारणांसाठी अथक प्रयत्न सुरूच ठेवले होते. त्यांनी १९७८मध्ये ऐतिहासिक कँप डेविड करारामध्ये मध्यस्थी केली. १९८२मध्ये त्यांनी कार्टर सेंटरची स्थापना केली. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी सर्व वंचित क्षेत्रांमध्ये त्यांनी कामे केली.
When I look at Jimmy Carter, I see a man not only for our times, but for all times. A man who embodied the most fundamental human values we can never let slip away.
And while we may never see his likes again, we would all do well to try to be a little more like Jimmy Carter. pic.twitter.com/I0xDM05xmH
— President Biden (@POTUS) December 30, 2024
पत्नीचे गेल्या वर्षी झाले होते निधन
जेम्स अर्ल कार्टर ज्युनियर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२४मध्ये प्लेन्समध्ये झाला होता. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांना पुस्तके आणि त्यांचा बापटिस्ट धर्म खूप आवडत होता. अमेरिकेच्या नौदल अकादमीमधून त्यांनी परमाणु विज्ञानाता अभ्यास केला आणि १९४६मध्ये ग्रॅज्युएशन केले. त्याच वर्षी त्यांचे रोजलिन स्मिथ यांच्याशी लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे निध १९ नोव्हेंबर २०२३मध्ये वयाच्या ९६व्या वर्षी झाले होते