मुंबई: भारतात जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. येथे लोक दररोजच्या जीवनात असे जुगाड करत असतात ही ते खरंच हैराण करणारे असतात. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये या इलेक्ट्रिक गाडीच्या टेक्निकचा असा वापर दाखवला की पाहणारे सारेच हैराण झालेत.
हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्म @HasnaZaruriHai नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेला व्यक्ती सांगत आहे की इलेक्ट्रिक कारच्या निर्मात्यांनी विचारही केला असेल की असाही वापर करता येईल. हा व्हिडिओ घराच्या अंगणात रेकॉर्ड करण्यात आला आहे. येथे व्हिडिओतील कुटुंब गाजरचा हलवा बनवण्याच्या तयारीत आहे. अंगणात लाकडे जळवून मोठ्या पातेल्यात दूध गरम केले जात आहे. महिला गाजर किसत होती. मात्र मेहनत कमी करण्यासाठी त्यांनी एक जुगाड ेकेला.
पाहा व्हायरल व्हिडिओ
कार बनाने वालों ने ये कभी नहीं सोचा होगा की Electric कार इस काम भी आ सकती है
😮😮😮😮😮😮 pic.twitter.com/dpUX3YIAzo— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) December 29, 2024
घराच्या बाहेर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या जवळ एका टेबलावर मिक्सर ग्राईंडर ठेवला होता. हा मिक्सर कारच्या विजेवर चालत होता. ही टेक्निकच या व्हिडिओला खास बनवते.