Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिक'ती'ची गोष्टMenstrual Cycle : मासिक पाळी रेग्युलर येत नाहीत? या ८ ड्रिंक्सचं सेवन...

Menstrual Cycle : मासिक पाळी रेग्युलर येत नाहीत? या ८ ड्रिंक्सचं सेवन करा पिरियड्स रेग्युलर येईल.

हल्ली मासिक पाळी अनियमित न येणे ही अनेक महिलांमध्ये जाणवणारी सामान्य समस्या झाली आहे. काही महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, जे पूर्णत: चुकीचं आहे. महिलांना अनेकदा मासिक पाळीमुळे बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतात. मग ते कुणाच लग्नकार्य असो किंवा पिकनिक. अशावेळी मुली, महिला पाळी पुढे जाण्याच्या किंवा पाळी लवकर येण्याच्या गोळ्या घेण्याचं धाडस करतात. मात्र ज्याचा नकारात्मक परिणाम महिलांच्या शरीरावर होत असतो. मासिक पाळी ही नैसर्गिक कृती आहे. तुमची अनियमित पिरीयडची समस्या कालांतराने मोठ्या समस्येत रूपांतरीत होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळी नियमित करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती पेय वतीने अत्यंत फायद्याचं ठरेल. या पेयांनी तुमची पाळी वेळेत येऊ शकेल शिवाय पोटदुखी, क्रॅम्स यापासून आराम मिळू शकेल.

पाणी

Tips for a healthy period | Whisper

एकूणच आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे आणि मासिक पाळीत होणारी सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते.

आल्याचा चहा आणि लिंबू 

How to Make Ginger Tea With Lemon - Life is Better with Tea

आल्याच्या चहामध्ये इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे मासिक पाळी रेग्युलर येण्यास मदत होते. पिरीयड रेग्युलर करण्यासाठी नियमित आल्याचा चहा आणि त्यात लिंबू पिळून प्यावे.

कॅमोमाइल टी

Tea Help With Period Cramps

कॅमोमाइल चहाचा वापर नैसर्गिक झोपेसाठी मदत म्हणून केला जातो. या फुलांच्या चहामध्ये आढळणारी संयुगे (ग्लिसीन आणि हिप्प्युरेट) स्नायूंच्या उबळांपासून आरामशी संबंधित आहेत. परिणामी क्रॅम्पिंग आणि तणाव कमी होतो.

हॉट चॉकलेट

Why Do I Crave Chocolate So Intensely? – Kron Chocolatierडार्क चॉकलेट हे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी ओळखले जाते.कारण त्यात कोको बीन्स असते, जे फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहे.

हळदीचे दूध 

10 benefits of turmeric milk and how to make it | Vinmec

हळदीतील इन्फ्लेमेटरी आणि ऍटीऑक्सीडंट गुणधर्म पिरीयडच्या वेदना, क्रॅम्प्स कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. याशिवाय पिरीयड रेग्युलरही होतात.

दालचिनीचा चहा

Cinnamon water Stock Photos, Royalty Free Cinnamon water Images |  Depositphotos

मासिक पाळीमध्ये सकाळी दालचिनीचा चहा घेतल्यास दिवसभरात होणारी मळमळ कमी होवू शकते. दालचिनीमधील युजेनॉल हे घटक मळमळ होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सला नियंत्रणात आणण्याचं काम करतं.

डाळिंबाचा रस

How to Make Pomegranate Juice with a Blender - Extreme Wellness Supply

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात ऍटी-ऑक्सिडंट पिरीयड रेग्युलर करण्यात फायदेशीर ठरतात. त्यामुळे पिरीयड नियमित करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला हवा.

अननसाचा रस 

Best Juices For Period Crampsअननसात ब्रोमेलॅन एन्झाइम आढळते. पिरीयडमधील वेदना आणि इररेग्युलर पिरीयड नियमित करण्यासाठी फायदेशीर असते. अनियमित पिरीयड नियमित करण्यासाठी दररोज १ कप अननसाचा रस प्यावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -