मुरुड : नाताळाच्या सणापासून सलग सुट्टी असल्याने जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जंजिरा किल्ला पाहून झाल्यानंतर पर्यटक मुरुड मधून पळ काढत आहेत. यावर्षी लॉजिंग हॉटेल व्यवसाय तोट्यात गेले आहेत. मुरुड मध्ये पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटकांनी बुकिंग केली नाही असे लॉज मालक व चालकांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांनी मुरुडकडे पाठ फिरवल्याचे लॉज व हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वाढलेल्या वाहनांमुळे मुरुड मध्ये ठीक ठिकाणी ट्राफिक जाम झाल्याचे दिसून आले.
नाताळाच्या सणापासून सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. यामध्ये मुरुड हा जगप्रसिद्ध झाला आहे, याची ‘मिनी गोवा’ म्हणून ओळख झालेली आहे, त्यामुळे मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात मुरुड मध्ये जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. नेहमी प्रमाणे यावर्षी मुरुड मध्ये पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटकांनी लॉजिंग मध्ये बुकिंग केली नसल्याचे लॉज चालक गौरव हणुमंते यांनी सांगितले. किल्ला पाहण्यासाठी वाढलेल्या वाहनांच्या रहदारीमुळे मुरुड बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे.
मुरुड समुद्रकिनारी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे, मुरुड मच्छीमार मार्केट या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात, नांदगाव बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत असल्याचे दिसून आले. मुरुड मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले पण ते थांबलेच नाही न थांबतानाच निघून गेले याचे कारण मुरुड नगरपरिषदेतर्फे दरवर्षी पर्यटन महोत्सव आयोजित केला जातो तो यंदा नसल्याने पर्यटकांनी मुरुड कडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली असल्याने लॉज मालक, चालक व हॉटेल व्यवसायिक हे मोठ्या नुकसानीत गेले आहेत.