Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध

Central Railway Platform Ticket :  मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध

मुंबई : वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध २९-१२-२०२४ ते ०२-०१-२०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.

खालील १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री प्रतिबंधित आहे :-

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस. ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरगि आणि लातूर

विशेष सूट 


वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे.वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे ही विनंती करण्यात येत आहे.

Comments
Add Comment